नावीन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना | शेळी पालन, गाय, म्हैस वाटप, कुक्कूटपालन योजना

 

नविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2025

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध लाभदायक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेळी मेंढी गट वाटप योजना, दूध दुधाळ गाई म्हशी वाटप योजना, कुक्कुटपालन (कोंबडी पालन) योजना अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या योजना mahabms online portal वर उपलब्ध असून, शेतकरी व ग्रामीण नागरिक यांना याचा थेट लाभ घेता येतो. खाली या योजनांबाबत सर्व माहिती, अर्ज पद्धत आणि पात्रता यांचा सविस्तर आढावा दिला आहे.


  • mahabms online form 2025

  • पशुसंवर्धन योजना महाराष्ट्र

  • शेळी वाटप योजना अर्ज

  • गाय वाटप योजना ऑनलाइन फॉर्म

  • म्हैस वाटप योजना mahabms

  • कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र

  • mahabms.gov.in animal husbandry schemes

  • mahabms अर्ज प्रक्रिया 2025

  • mahabms योजना नोंदणी

  • mahabms जिल्हास्तरीय योजना अर्ज

अर्ज करण्याची मुदत: 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेवर अर्ज करावा.

अर्ज कसा करावा? - mahabms online form process

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://mahabms.com

  2. 'पशुसंवर्धन विभाग योजना' या विभागावर क्लिक करा.

  3. आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्व योजनांची माहिती आणि अर्जाचे पर्याय दिसतील.

  4. 'अर्जदार नोंदणी' या पर्यायावर क्लिक करून सर्वप्रथम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

  5. आधार क्रमांक, वय, नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, गाव इ. माहिती भरावी.

  6. जात व प्रवर्ग निवडावा (SC/ST/NT/VJ/General)

  7. आवश्यक प्रमाणपत्रे - जात प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शैक्षणिक पात्रता, आठ अ क्षेत्राची माहिती (असल्यास), बँक तपशील, फोटो आणि सही अपलोड करावी.

  8. कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावी - आधार क्रमांक, नाव, लिंग, वय इत्यादी.

  9. सर्व अटी व शर्ती वाचून 'मला अटी मान्य आहेत' यावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.

कोणकोणत्या योजना आहेत?

1. दुधाळ गाई/म्हशी वाटप योजना

दुधाळ गाई व म्हशी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची योजना. या योजनेतून दुग्धोत्पादन वाढवण्याचा उद्देश आहे.

2. शेळी मेंढी गट वाटप योजना

गट पद्धतीने 10-20 सदस्यांना शेळी मेंढ्यांचे वाटप केले जाते. महिलांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.

3. कुक्कुटपालन (कोंबडी पालन) योजना

100 कुक्कुट पक्ष्यांचे गट वाटप करणे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व महिलांसाठी उपयुक्त.

4. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना

जिल्ह्याच्या स्तरावर व राज्य स्तरावर उपलब्ध योजना: गट वाटप, पिल्लांचे वाटप, सुधारित पशुपालन योजना इत्यादी.

अर्ज करताना आवश्यक असलेली माहिती:

  • आधार कार्ड क्रमांक

  • मोबाईल नंबर व ईमेल (ईमेल ऐच्छिक)

  • जात व प्रवर्ग

  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)

  • पिवळे रेशन कार्ड (दारिद्र रेषेखालील)

  • शैक्षणिक पात्रता

  • आठ अ जमीन क्षेत्र (असल्यास)

  • रेशन कार्ड क्रमांक (12 अंकी)

  • बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड

  • अर्जदाराचा फोटो (800 KB पर्यंत jpg/jpeg/png)

  • सही (Signature)

अर्जदाराची स्थिती व पात्रता तपासणे:

  • भूमिहीन आहे का?

  • अल्पभूधारक (1 ते 2 हेक्टर)?

  • सुरक्षित बेरोजगार आहे का?

  • मागील 3 वर्षांत शासकीय लाभ घेतला आहे का?

  • कुटुंबातील सदस्य लोकप्रतिनिधी आहेत का?

  • तिसरे अपत्य 1 मे 2001 नंतर जन्मले आहे का?

  • महानगरपालिका/नगरपरिषद क्षेत्रातील रहिवासी आहे का?

अर्ज केल्यानंतर काय?

  1. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो.

  2. लॉटरीद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड होते.

  3. निवड झाल्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

  4. अंतिम यादी mahabms.com वर प्रसिद्ध केली जाते.

  5. अर्जाचा स्टेटस पाहण्यासाठी 'केलेले अर्ज' किंवा 'अर्जदार लॉगिन' वर क्लिक करून आधार क्रमांक व पासवर्ड टाकावा.

  6. पासवर्ड विसरल्यास 'Forgot Password' पर्याय वापरता येतो.

  • अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा.

  • कोणतीही माहिती चुकीची दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.

  • अर्जाची प्रिंट घ्यावी व सुरक्षित ठेवावी.

Post a Comment

0 Comments